रत्नागिरी – साखरपा येथे अवैध वाहतूक दारु करणारी गाडी पकडली, 12 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी कोल्हापूर हायवे वरील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा चेक पोस्ट येथे कोल्हापूर वरून रत्नागिरी जिल्ह्यात अवैधरित्या दारु वाहतूक करणारी MH-09-EM-3105 ही गाडी पकडण्यात आली आहे. या जीपसह एकूण 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सुरेश देऊ देबाजे (कोल्हापूर) हा सदर गाडी चालवित होता. त्याला साखरपा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पिकअप गाडी आणि विदेशी बनावटीचा माल असा एकूण सुमारे 12 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. देवरुखचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साखरपा मुर्शी चेकपोस्ट येथे कार्यरत असलेले पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, उपनिरीक्षक विद्या पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय उकार्डे, अंमलदार संजय मारळकर, वैभव कांबळे,सचिन भुजबळराव, रोहित यादव, प्रशांत नागवेकर, चालक वैभव नटे, होमगार्ड फोंडे, शिंदे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

लॉकडाऊन शिथिल झाल्याचा फायदा घेत अवैधरित्या या मालाची वाहतूक करण्यात येत होती. परंतु चेक नाक्यावर दक्ष असलेल्या पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख आणि संजय उकार्डे यांनी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली. पकडण्यात आलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर चाप बसणार आहे.