
पौराणिक गोष्टी आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा संगम साधणारा ‘एकान्स – एक से बडकर स्नेक’ हा शो आजपासून कार्टून नेटवर्कवर प्रसारित होणार आहे. त्यानंतर ही मालिका सोमवार ते शुक्रवार सकाळी 11.30 वाजता आणि संध्याकाळी 7.30 वाजता याच चॅनलवरून प्रसारित होईल.
यात एका 13 वर्षीय एवान्सला दर्शवण्यात आले आहे. त्याला शक्तिशाली सापांकडून मानवतेचे रक्षण करण्यासाठी ‘नागमणी’ भेट मिळाला आहे. तसेच सापांकडून मिळालेल्या हायटेक सुपरपावर सूटमुळे खलनायकांना चतुराईने मात देण्याची अतिरिक्त क्षमता त्याला प्राप्त झाली आहे. कार्टून नेटवर्कची ही पहिली स्वदेशी, साय-फाय सुपरहिरो ऍनिमेटेड मालिका आहे.

























































