मायक्रोसॉफ्टमध्ये शोधली त्रुटी! दिल्लीच्या 20 वर्षीय तरुणीला कंपनीकडून 22 लाखांचे बक्षीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सिंह असे या तरुणीचे नाव आहे. ती सायबर सिक्युरिटी ऍनालिस्ट म्हणून मॅप माय इंडियामध्ये काम करत आहे. अदितीने मायक्रोसॉफ्टची क्लाऊड सिस्टम Azure मध्ये त्रुटी शोधली. त्यामुळे तिला बाउंंटी स्करूपात ही रक्कम मिळाली आहे. आदितीला मायक्रोसॉफ्टच्या Azure या क्लाऊड प्लॅटफॉर्मवर Remote Code Execution बग सापडले आहे. या बगसंदर्भातील माहिती अद्याप सार्वजनिकरित्या जाहीर केलेली नाही. दरम्यान, मायक्रोसॉफ्टकडून आलेल्या मेलचे क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करत अदितीने आनंद व्यक्त केला आहे.

गुगल, यू-टय़ूबवरून शिकली प्रोग्रामिंग

शालेय शिक्षणानंतर अदितीने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये बीसीएसाठी ऍडमिशन घेतले. अदिती म्हणाली, मी javascript, mysql आणि इतर प्रोग्रामिंग लॅंग्केज गुगल आणि यू-टय़ूबवर शिकले आहे. मला बग बाउंटीमध्ये रस होता. कसे रिपोर्ट करायचे हेदेखील मी शिकले आहे. हे शिकण्यासाठी मला साधारण एक वर्षाचा कालावधी लागला.