WTC FINAL 2023 – टक्केवारीने मिळणार फायनलचे तिकीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने विराट कोहलीच्या हिंदुस्थानी संघाला हरवून पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. आता आयसीसीकडून दुसऱया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा बिगूल वाजवण्यात आला आहे. 2021 ते 2023 या सालात होणाऱया या प्रतिष्ठsच्या स्पर्धेसाठीची गुणप्रणाली आयसीसीकडून या वेळी जाहीर करण्यात आली. नऊ संघांमध्ये होणाऱया जेतेपदाच्या लढतीत प्रत्येक संघ सहा मालिका खेळणार आहे. प्रत्येक कसोटी विजयाला सहा गुण देण्यात येणार असून ‘ड्रॉ’ झालेल्या लढतींना चार व ‘टाय’ झालेल्या लढतींना सहा गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘परसेंटेज पॉइंट सिस्टीम’ हा नियम या वेळीही लागू करण्यात आला आहे. कोणताही संघ उपलब्ध गुणांपैकी किती गुण मिळवतो या आधारावरच गुणतालिका तयार करण्यात येणार आहे. एकूणच काय तर ज्या संघांची टक्केवारी जास्त असेल तेच संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहेत.

पाच सामन्यांच्या फक्त दोनच मालिका

दुसऱया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पाच सामन्यांचा समावेश असलेल्या फक्त दोनच कसोटी मालिका असणार आहेत. हिंदुस्थान-इंग्लंड व ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या दोन मालिकांमध्ये पाच कसोटी सामन्यांचा समावेश असेल. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी मालिका चार सामन्यांची असणार आहे. या दोन वर्षांमध्ये सात मालिका तीन सामन्यांच्या तर 13 मालिका दोन सामन्यांच्या असणार आहेत.

टीम इंडिया इंग्लंड, आफ्रिका, बांगलादेशला परदेशात भिडणार

टीम इंडियाचा संघ इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व बांगलादेश या तीन देशांविरुद्ध परदेशात कसोटी मालिका खेळेल. तसेच न्यूझीलंड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या देशांविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड व बांगलादेश या देशांचा सहभाग असणार आहे. ‘स्लो ओव्हर रेट’चा फटका संघांना बसणार आहे. या वेळी त्यांना एक गुणाला मुकावे लागणार आहे.

वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंड, खेळणार फक्त 13 सामने

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणारे नऊ संघ प्रत्येकी सहा मालिका खेळतील. प्रत्येक संघ तीन मालिका मायदेशात तर तीन मालिका परदेशात खेळेल. नुकताच वर्ल्ड चॅम्पियन झालेला न्यूझीलंडचा संघ पुढील दोन वर्षांमध्ये फक्त 13 कसोटी सामने खेळणार आहे. इंग्लंडचा संघ सर्वाधिक 21 कसोटी सामने खेळेल. हिंदुस्थानचा संघ 19, ऑस्ट्रेलियन संघ 18 कसोटी सामने खेळेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ 15, पाकिस्तानचा संघ 14 कसोटी सामने खेळेल. बांगलादेशचा संघ सहभागी असलेल्या सहाही मालिका दोन सामन्यांच्या असणार आहेत.