
गोरेगाव पूर्व, आरे कॉलनीच्या शिबा रोड येथे मोकळ्या जागेत काडतुसे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी आरे पोलिसांनी ती 40 काडतुसे जप्त करून तपासणीसाठी कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहेत. अहवाल आल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा होणार आहे. शिबा येथील मोकळ्या जागेत काडतुसे पडल्याची माहिती कुरार पोलिसांना मिळाली. त्यानंतर कुरार पोलीस घटनास्थळी आले. कुरार पोलिसांनी याची माहिती आरे पोलिसांना दिली. आरे पोलिसांनी पंचनामा करून ती काडतुसे ताब्यात घेतली. ती काडतुसे नेमकी कोणाची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. फॉरेन्सिक अहवालानंतर ती काडतुसे जिवंत आहेत का हे स्पष्ट होणार आहे.


























































