
महिला एकेरीत अॅश्ले बार्टी व अरिना सबालेंका यांनीही आगेकूच केली. अॅश्ले बार्टी हिने बार्बेरा व्रेझिकोवा हिला 7-5, 6-3 अशा फरकाने पराभूत केले. बार्बेरा व्रेझिकोवा हिने या वर्षी फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला होता. अरिना सबालेंकाने एलिना रायबकिना हिला 6-3, 4-6, 6-3 अशा तीन सेटमध्ये हरवले.

























































