
गोव्यातील हणजुणा पोलीस स्टेशन येथून सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार चोरीस गेल्याची माहिती लांजा पोलीस स्टेशनला देण्यात आली होती . लांजा पोलीस स्टेशनवरून ही माहिती चिपळूण वाहतुक मदत केंद्र यांना मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार गोरीवले, राठोड, शिंदे, पोलीस नाईक कदम यांनी नाकाबंदी केली.
प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत होती. याचवेळी चिपळूणच्या दिशेने येणारी सिल्व्हर कलर स्विफ्ट कार (KA23 N7342) पोलिसांच्या नजरेस पडली आणि कार चोरटे जंगलात पळून जात असतांना पोलीसांनी त्यांना पकडले. चोरीच्या स्विफ्ट कारसह दोन वाहन चोर यांना चिपळूण पोलीस ठाण्याचे अधिकारी पीएसआय पड्याळ यांच्या ताब्यात दिले आहे.
























































