‘स्मार्टफिल’मुळे प्लॅस्टिकपासून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅस्टिकमुळे होणारी प्रदूषणाची समस्या लक्षात घेता हिंदुस्थान युनिलिव्हरने होम केअर उत्पादनांसाठी ‘स्मार्टफिल’ ही इन-स्टोअर वेन्डिंग मशीन लाँच केली आहे. हा अनोखा उपक्रम ग्राहकांना त्यांच्या प्लॅस्टिक बॉटल्सचा पुनर्वापर करण्याची सुविधा देतो. या मशीनमधून ग्राहक कंपनीच्या सर्फ एक्सेल, कम्फर्ट व विम आदी उत्पादनांचे रिफिलिंग करू शकतात. रिफिलिंगसाठी ग्राहक त्यांच्या जुन्या रिकाम्या बॉटल्सचा वापर करू शकतात किंवा स्टोअरमधून किफायतशीर दरामध्ये स्मार्ट फिलिंग बॉटल खरेदी करू शकतात. स्वतःची बॉटल आणणाऱ्या ग्राहकांना सूट मिळणार आहे. सध्या हे मशीन मुंबईतील रिलायन्स स्मार्ट अॅक्मे मॉल येथे ठेवले आहे.