
हिंदुस्थानची महिला बॉक्सर लोवलीना बोर्गोहेन हिने 69 किलो वजनी गटात मंगळवारी दिमाखदार कामगिरी करताना उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. टोकियो ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग या खेळातील 69 किलो वजनी गटात लोवलीना बोर्गोहेन हिने जर्मनीच्या नदाईन अॅपेट्झ हिच्यावर 3-2 अशा फरकाने रोमहर्षक विजय मिळवला आणि आगेकूच केली. आता पदकापासून ती फक्त एक पाऊल दूर आहे.
लोवलीना बोर्गोहेन ही पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. जर्मनीची खेळाडू ही तिच्यापेक्षा 12 वर्षांनी सीनियर होती. 35 वर्षीय नदाईन अॅपेट्झ ही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी जर्मनीची पहिली बॉक्सर ठरलीय हे विशेष. लोवलीना बोर्गोहेन-नदाईन अॅपेट्झ यांच्यामधील लढत थरारक झाली. हिंदुस्थानच्या बॉक्सरने काही फरकाने ही लढत जिंकली.



























































