
गाडीत शारीरिक संबंध ठेवत असताना एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिला हृदयविकाराचा धक्का आल्याने तिचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
ही घटना ब्राझीलच्या साओ पाऊलो या ठिकाणी घडली. येथील गॅब्रियली डिक्सन नावाची मुलगी एका 26 वर्षांच्या तरुणासोबत गाडीत बसली होती. तिथे त्यांच्यात शारीरिक संबंध आला.
शारीरिक संबंधांवेळी अचानक गॅब्रियली बेशुद्ध पडली. तिचे ओठ आणि त्वचा पिवळी पडली होती आणि हात पाठच्या बाजुला वळले होते. तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचारही करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला.
रुग्णालयाने त्वरित पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी या तरुणाची कसून चौकशी केली. दरम्यान, रुग्णालयाने तिच्या मृतदेहाची तपासणी केली तेव्हा तिच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नसल्याचं तसेच तिच्या खासगी अवयवांमध्ये रक्तस्राव होत असल्याचं दिसून आलं.
या तरुणाने गॅब्रियलीसोबत प्रेमसंबंध असल्याचं पोलिसांच्या चौकशीत कबूल केलं. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं. ब्राझीलमध्ये सहमतीने शरीरसंबंध ठेवण्याचं वय 14 वर्षं असल्याने या तरुणावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा लावण्यात आलेला नाही.



























































