ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये एक हजार युजर जोडले जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्टंट मॅसेजिंग अॅप टेलिग्रामची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनीने नुकतेच ग्रुप व्हिडिओ कॉलिंग या फिचरमध्ये नवीन अपडेट दिले आहे. त्यानुसार ग्रुप व्हिडिओ कॉलिंगमध्ये तब्बल एक हजार जणांना सहभागी होता येणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ कॉल्समध्ये 30 युजर्स त्यांचा कॅमेरा आणि स्क्रीनवरून व्हिडिओ प्रसारित करू शकतात आणि एक हजार जण हा ग्रुप व्हिडिओ कॉल पाहू शकतील. ऑनलाईन लेक्चर, सेमिनारसाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय टेलिग्रामने आपले व्हिडिओ मॅसेज फीचर अपडेट केले आहे. व्हिडिओ मॅसेज आता जास्त रिजोल्युशनमध्ये असतील. तसेच टेलीग्रामद्वारे तुम्हाला पाठवलेल्या व्हिडिओचा प्लेबॅक स्पीडदेखील बदलता येणार आहे.