अॅथलेटीक्समध्ये निराशाच, हिंदुस्थानच्या तिन्ही धावपटूंचा फ्लॉप शो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी अॅथलीट्सची टोकियो ऑलिम्पिकमधील सुमार कामगिरी गुरुवारीही सुरूच राहिली. पुरुषांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार, राहुल व केटी इरफाण या हिंदुस्थानी धावपटूंची अनुक्रमे 23, 47 व 51व्या स्थानावर घसरण झाली.

संदीप कुमारने 1.25.07 अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली. राहुलने 1.32.06 अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली. तसेच केटी इरफाण याने 1.34.41 अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली. हिंदुस्थानच्या तिन्ही धावपटूंना सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीही करता आली नाही ही खेदजनक बाब.

इटलीच्या धावपटूने पटकावले गोल्ड

पुरुषांच्या 20 मीटर चालण्याच्या शर्यतीत इटलीच्या मॅसीनो स्टॅनो याने सुवर्ण पदक पटकावले. त्याने 1.21.05 अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. जपानच्या खेळाडूंनी रौप्य व कास्य पदक जिंकले. कोकी इकेडा याने 1.21.14 अशा वेळेसह रौप्य व तोशिकाझू यामानिशी याने 1.21.28 अशा वेळेसह कास्य पदक जिंकले.

गोल्फमध्ये अदितीची चमक

गोल्फ या खेळात हिंदुस्थानी खेळाडूंकडून मोठी अपेक्षा बाळगली जात नाही. पण यंदा महिला गटात अदिती अशोकने लक्षवेधक कामगिरी केली आहे. दुसऱया फेरीअखेर ती संयुक्तपणे दुसऱया स्थानावर आहे. त्यामुळे पदक जिंकण्याच्या तिच्या आशा कायम आहेत. दीक्षा डागर हिला मात्र 53व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. या स्पर्धेच्या दोन फेऱया अद्याप बाकी आहेत.