Photo – टोकियोमध्ये हिंदुस्थानच्या पदकांची ‘सप्त’पदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये हिंदुस्थानच्या नीरज चोप्रा याने शनिवारी सुवर्णवेध घेतला आणि हिंदुस्थानला सातवे पदक जिंकून दिले. आजपर्यंत झालेल्या कोणत्याही एका ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे हे सर्वाधिक पदकं आहेत. याआधी 2012 ला झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने दोन रौप्यपदकांसह सहा पदकं जिंकली होती.

1. नीरज चोप्रा (Neeraj Chopra)

neeraj-chopra-gold

भालाफेकमध्ये हिंदुस्थानच्या नीरज चोप्रा याने 87.58 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक जिंकले.

2. मीराबाई चानू (Mirabai Chanu)

meerabai-chanu-silver-medal

वेटलिफ्टींगमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटामध्ये मीराबाई चानू हिने रौप्यपदकावर मोहोर उमटवली.

3. रवीकुमार दहिया (Ravi Dahiya)

ravikumar-dahiya-silver

कुस्तीत हिंदुस्थानच्या रवी कुमार दहिया याने 57 किलो वजनी गटामध्ये रौप्यपदक जिंकले.

4. बजरंग पुनिया (Bajrang Punia)

bajrang-punia-bronze

कुस्तीमध्ये 65 किलो वजनी गटामध्ये बजरंग पुनिया याने कझाकीस्तानच्या पहिलवानाला धूळ चारत कांस्यपदकावर नाव कोरले.

5. पी.व्ही. सिंधू (PV Sindhu)

pv-sindhu-bronze

रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती बॅडमिटनपटू पी.व्ही. सिंधू हिने चीनच्या खेळाडूचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.

6. लवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain)

lavlina-borgohain

महिलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत लवलीना बोरगोहेन हिने हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून दिले.

7. पुरुष हॉकी संघ (India men’s hockey team)

mens-hockey-team-bronze

हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करत तब्बल 41 वर्षानंतर पदक जिंकून दिले. हिंदुस्थानने कांस्यपदकावर नाव कोरले.