
शॉटसर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही आग न्यू कोपरे गावातील एका गोदामात लागली होती. या गोदामात अवैधरित्या साठविलेल्या केमिकलच्या साठ्याला 7 ऑगस्टला आग लागली होती. याप्रकरणी तरूणाविरूद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीत जखमी झालेल्या बिजेश केश नारायण सहानी (वय 20) याचा मृत्यू झाला आहे.
उत्तमनगर परिसरातील न्यू कोपरे गावातील एका गोदामात सहानी बंधूनी केमिकलचा अवैध साठा केला होता. त्याला 7 ऑगस्टला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये सहानी भावंडे जखमी झाले होते. उपचारादरम्यान ब्रिजेश सहाणी याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाययोजना न करता केमिकलचा साठा करत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित सहानींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश माने अधिक तपास करीत आहेत.




























































