
सांगली जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या 40 बालकांकर मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात पुढील दोन दिवस हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या बालकांची आणि त्यांच्या पालकांची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
शस्त्रक्रिया करण्यात येणाऱया बालकांच्या पालकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, डॉक्टरांना आपण देक मानतो. कोविडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्कच घटक आपले योगदान देऊन समाजसेवा करीत आहेत. या काळात काही डॉक्टर कोविडव्यतिरिक्त इतर आजार असणाऱया व्यक्तींवर उपचार करण्यासाठी गावोगावी जाऊन सेवा देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सांगली जिह्यातील या बालकांना असलेला आजार वेळेत लक्षात आल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व घटकांना यावेळी आदित्य ठाकरे यांनी धन्यवाद दिले. शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेचा बालकांना मदतीचा हात
राष्ट्रीय बाल स्कास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी आणि शाळेतील बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम राबवला जातो. मागील मार्चपासून राज्यात कोरोना आपत्ती व सद्यस्थितीत महापुराची परिस्थिती यामुळे अंगणवाडी व शाळा बंद असल्याने सदर योजनेअंतर्गत नियुक्त पथकांनी सांगली जिह्यातील बालकांची गावागावात शिबिरांद्वारे तपासणी केली असता 40 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. या शस्त्रक्रियांकरिता अंदाजे दोन कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून सदरची सर्व बालके ही गरीब परिवारातील असल्याने सदरच्या शस्त्रक्रिया पूर्ण करणे त्यांच्या पालकांना अवघड होते. त्यासाठी सांगली जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय तसेच सांगली जिल्हा शिवसेना यांच्या माध्यमातून राष्ट्रीय बाल स्कास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध होणारा निधी, शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या बालकांवर मुंबई येथील एसआरसीसी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.





























































