
नाशिकची क्रिकेटपटू माया सोनवणे हिची हिंदुस्थानी संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे. यातूनच ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी अंतिम संघ निवडला जाणार आहे.
बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत 10 ते 28 ऑगस्ट दरम्यान होणाऱया 35 खेळाडूंच्या शिबिरासाठी माया रवाना झाली आहे. या खेळाडूंमधूनच राष्ट्रीय महिला क्रिकेट निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी अंतिम राष्ट्रीय संघ निवडणार आहे.
मूळ सिन्नर येथील मायाने अतिशय साधारण परिस्थितीतही जिद्दीने सराव सुरू ठेवला. वयाच्या 11व्या वर्षीच तिची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. उत्पृष्ट लेगस्पिनर असलेली माया मधल्या फळीतील भरवशाची फलंदाज आहे. तिने पुदुचेरीत 23 वर्षांखालील टी-ट्वेंटी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चांगली कामगिरी केली. 2014-15 व 2017-18च्या हंगामात देशात सर्वाधिक 15 गडी बाद करण्याचा विक्रम केला. प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात तिची निवड झाली होती. आता राष्ट्रीय शिबिरासाठीच्या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेट विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व पदाधिकाऱयांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गुलाबी चेंडूवर सामना रंगणार
हा संघ ऑस्ट्रेलिया दौऱयात गुलाबी चेंडूवरील एक कसोटी सामना खेळणार आहे. त्याचबरोबर तेथे तीन एकदिवसीय तसेच तीन टी-ट्वेंटी सामनेही होणार आहेत.

























































