बायसेक्शुअल आहे बिग बॉसची ही स्पर्धक, लग्नाविषयी केला धक्कादायक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉस ओटीटीचे पहिले सिझन सुरू झाले आहे. पहिल्या दिवसापासून घरात छोट्याछोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू झाली आहेत. असे असतानाच आता एका महिला स्पर्धकाने एक धक्कादायक खुलासा केला.

moos-jattana-1

बिग बॉस ओटीटीची स्पर्धक मूस जट्टाना हिने ती बायसेक्श्य़ुअल असल्याचे सांगितले आहे. तिने सह स्पर्धक प्रतीकसोबत बोलताना हा खुलासा केला आहे. तसेच लग्नाबाबतचे तिचे सिक्रेटही तिने यावेळी सांगितले आहे. ‘मी बायसेक्श्युअल आहे. मला मुलगा व मुली दोन्ही आवडतात. मात्र माझं जास्त आकर्षण मुलांकडे आहे. असे असले तरी आयुष्यभराचा साथिदार निवडताना जर एखाद्या मुलीशी माझे विचार चांगले जुळले तर मी तिला देखील माझा पार्टनर बनवू शकते’ असे मूसने सांगितले आहे.

मूस ही घरात निशांत भट्टची कनेक्शन बनून आली आहे. मात्र प्रतीकसोबत तिचा चांगला बाँड तयार झाला आहे. सिझनच्या पहिल्याच दिवशी मूसचे मिलिंद गाबासोबत भांडण झाले होते. तसेच अक्षरा सिंहसोबत देखील तिचे भांडण झाले होते.

मूस जट्टानाचे खरे नाव हे मुस्कान जट्टाना आहे. ती 20 वर्षांची आहे. मूळची पंजाबमधील मोहालीची राहरणारी मूस ही मीड़िया इन्फ्ल्युएन्सर व ब्लॉगर आहे. मूस ही महिलांच्या हक्कांसाठी लिहीत असते.