
आयपीएलच्या उर्वरीत मोसमातील ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा सहभाग निश्चित झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेटपटूंना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत यूएईत खेळवण्यात येणाऱया आयपीएलच्या उर्वरीत मोसमात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा खेळ तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
सात खेळाडूंचा सहभाग निश्चित
आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या सात क्रिकेटपटूंचा सहभाग निश्चित असणार आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टिवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनीस, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स हे खेळाडू आयपीएलच्या उर्वरीत मोसमात पक्के खेळणार आहेत.
या खेळाडूंवर प्रश्नचिन्ह
जोश हेझलवूड, रायली मेरेडीथ, डॅन ख्रिस्तीयन, मोयसेस हेनरीक्स, मिचेल मार्श, जेसन बेहरेनडोर्फ, अॅडम झाम्पा, अॅण्डर्य़ू टे, नॅथन कुल्टर नाईल, ख्रिस लीन, बेन कटिंग व जोश फिलीप या खेळाडूंच्या सहभागाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. जोश हेझलवूड, मिचेल मार्श व जोश फिलीप यांनी हिंदुस्थानातील आयपीएलमधून माघार घेतली होती. पण आता त्यांचे पुनरागमन होऊ शकते. तसेच पॅट कमिन्स यानेही आयपीएलच्या उर्वरीत मोसमामधून माघार घेतली आहे. तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे.



























































