आता तीन सेना ‘एकच नियंत्रण’, पश्चिमी कमांडचे 4 लाख सेना, हवाई दल जवान सांभाळणार जम्मू-भूज सीमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कारगील युद्धातील त्रुटींवर मात करण्यासाठी आता हिंदुस्थानी लष्कराने आपल्या पथक निर्मिती आणि संरक्षण व्यूहरचनेत क्रांतिकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कारगील युद्धातून धडा घेत हिंदुस्थानी लष्कर मोठी सुधारणा करत आहे. याची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. आता आराखडा समोर आला आहे. हिंदुस्थानही अमेरिका, रशियाप्रमाणे लष्कराच्या चार थिएटर कमांड बनवणार असून यात तिन्ही सेना एका छताखाली एकाच प्रमुखाच्या आदेशावर चालतील.

पाकिस्तानला तोंड देणारी पश्चिमी कमांड जयपूरला असेल. तिची स्थापना ऑगस्ट 2022 ला होईल. ही कमांड चार लाखांपेक्षा जास्त जवानांची असेल. जम्मू ते पंजाब, राजस्थान व गुजरातपर्यंत 2300 किमी लांब सीमेची सुरक्षा तिची जबाबदारी असेल. सध्या पश्चिम भागात सेना व हवाई दल 5 कमांडमध्ये विभागले आहे. पश्चिम कमांडचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल किंवा एअर मार्शल दर्जाचा अधिकारी करेल.

कारगील समीक्षा समितीने 2001 मध्ये आणि 2016 मध्ये लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांच्या समितीने दोन आघाडय़ांवर लढण्यासाठी थिएटरायझेशनची शिफारस केली होती, जी आता मान्य झाली आहे.

हिंदुस्थानला गरज का?

स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानी लष्कराच्या फक्त दोन कमांड. लखनौत पूर्व, तर पुण्यात दक्षिण कमांड होती. नंतर 19 झाल्या. अनेकदा त्यांच्यात समन्वयाची अडचण येते. चीन व पाकिस्तानच्या दुहेरी धोक्याचा सामना करण्यासाठी थिएटरायझेशन सध्याची गरज आहे. एकीकृत योजना व युद्ध न होण्याने 1962 च्या चीन युद्धात हवाई दलाचा वापर न होणे आणि 1999 च्या कारगील युद्धात हवाई दल 15 दिवस उशिरा सहभागी होण्यासारखे परिणाम होतील.