पुणे पोलीस आयुक्तालयात तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील एका तरूणाने पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे.

बुधवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सुरेश पिंगळे या तरूणाने पुणे पोलीस आयुक्तालयाबाहेर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले आणि आतमध्ये प्रवेश केला. स्वतःला पेटवून घेत तरूण आयुक्तालयात आल्यानंतर सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी सुरेशच्या अंगावर चादर टाकून आग विझविली आणि त्याला उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खडकी पोलीस ठाण्यातंर्गत पोलीस अधिकारी काम करीत नसल्याचा आरोप करीत संबंधित तरूणाने हाताची नस कापून ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून जाळून घेण्याच प्रयत्न केला.