CPL 2021 चे वेळापत्रक जाहीर; शाहरुखच्या संघात पाकिस्तानी खेळाडूला स्थान, नेपाळचा खेळाडू बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅरेबियन प्रीमिअर लीग (सीपीएल) 2021 चे वेळापत्रक जाहीर झाले असून 26 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेची सर्व सामने सेंट किट्स अँड नेव्हीसमध्ये खेळले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी फ्रेंचाईजींनी आपल्या संघांचीही घोषणा केली असून बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. शाहरुखच्या त्रिनबैगो नाईट रायडर्स संघातून नेपाळच्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून त्याच्या जागी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज यासिर शाहला संघात स्थान देण्यात आले आहे.

कोरोनामुळे यंदा आयपीएल 2021 ही स्पर्धे मध्यावरच स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरु होणार आहेत. या स्पर्धेसाठी वेस्ट इंडीजचे खेळाडू उपलब्ध व्हावेत यासाठी सीपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्याचे आवाहन बीसीसीआयने केले होते. आयपीएलच्या उर्वरित सत्रासाठी सीपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. याआधी ही स्पर्धा 28 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर या काळात खेळली जाणार होती. मात्र आता ही स्पर्धा 26 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान खेळली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंना सीपीएल ते आयपीएल दरम्यान चार दिवसांचा कालावधी विश्रांतीसाठी मिळणार आहे.

सीपीएलसाठी फ्रेंचाईजींचे संघ –

त्रिनबैगो नाईट राइडर्स – किरोन पोलार्ड (कर्णधार), दिनेश रामदीन, सुनील नरेन, कॉलिन मुनरो, डॅरेन ब्रैवो, लेंडल सिमन्स, खैरी पियरे, अँडरसन फिलिप, टियन वेबस्टर, अकील होसेन, जैडेन सील्स, अली खान, रवि रामपॉल, इसुरु उदाना, लियोनार्डो जूलियन, यासिर शाह.

बारबाडोस रॉयल्स – जेसन होल्डर (कर्णधार), जॉनसन चार्ल्स, शाय होप, काइल मेयर्स, हेडन वाल्श जूनियर, रेमन रीफर, जस्टिन ग्रीव्स, नईम यंग, जोशुआ बिशप, मोहम्मद आमिर, थिसारा परेरा, आजम खान, ओशेन थॉमस, एश्ले नर्स, स्मित पटेल, ग्लेन फिलिप्स.

सेंट किट्स एंड नेविस पैट्रोइट्स – रयाद एमरिट (कर्णधार), ड्वेन ब्रैवो, शेल्डन कॉटरेल, एविन लुईस, फैबियन एलन, शेरफेन रदरफोर्ड, जॉन-रस जग्गेसर, डोमिनिक ड्रेक्स, जोशुआ डा सिल्वा, क्रिस गेल, डेवोन थॉमस, कॉलिन आर्चिबाल्ड, मिकाइल लुईस, आसिफ अली, रवि बोपारा, फवाद अहम, पॉल वैन मीकेरेन.

जमैका तल्लावाहस – रोवमॅन पॉवेल (कर्णधार), कार्लोस ब्रेथवेट, चैडविक वाल्टन, फिडेल एडवर्ड्स, वीरासामी, रयान परसौद, आंद्रे रसल, हैदर अली, जेसन मोहम्मद, कैस अहमद, मिगेल प्रिटोरियस, केनर लुईस, अभिजय मानसिंह, जोशुआ जेम्स, किर्क मैकेंजी, क्रिस ग्रीन, शमाराह ब्रुक्स.

गुयाना अमेजन वॉरियर्स – निकोलस पूरन (कर्णधार), इमरान ताहिरस, शिमरोन हेटमायर, ब्रॅडन किंग, नवीन-उल-हक, रोमारियो शेफर्ड, चंद्रपॉल हेमराज, ओडियन स्मिथ, अँथनी ब्रम्बल, केविन सिंक्लेयर, अशमीद नेड, शोएब मलिक, मोहम्मद हफीज, वकार सलामखिल, नियाल स्मिथ, गुडाकेश मोती.

सेंट लूसिया किंग्स – फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रहकीम कॉर्नवाल, आंद्रे फ्लेचर, केसरिक विलियम्स, ओबेद मॅककॉय, मार्क देयाल, रोस्टन चेज, जेवेल ग्लेन, समित पटेल, कीमो पॉल, वाहब रियाज, उस्मान कादिर, केरोन कॉटॉय, जेवर रॉयल, कदीम एलेने, अल्जारी जोसेफ.