
हिंदुस्थानच्या भाविनाबेन पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये क्लास-4 गटात दुसऱया सामन्यात दणदणीत विजय मिळविला. तिने चुरशीच्या लढतीत ब्रिटनच्या मेगन शॅकलेटन हिचा 3-1 फरकाने पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत 12व्या स्थानी असलेल्या भाविनाबेन पटेलसाठी ही लढत म्हणजे ‘जिंका किंवा मरा’ अशी होती. तिने पहिला सेट अवघ्या 8 मिनिटांत जिंपून लढतीची झकास सुरुवात केली. मात्र मेगन शॅकलेटन हिने दुसरा सेट जिंपून लढतीत पुनरागमन केले. त्यानंतर भाविनाबेन पटेल हिने पुढील दोन सेट जिंपून विजयावर शिक्कामोर्तब केले. भाविनाबेन पटेल हिला बुधवारी सलामीच्या लढतीत चीनची नंबर वन खेळाडू झोउ यिंग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे तिच्यासाठी आज अस्तित्वाची लढत होती. दोन सामन्यांत तीन गुणांची कमाई करीत भाविनाबेन पटेल हिने बाद फेरी गाठण्यात यश मिळविले.
‘सलामीच्या लढतीतील पराभव विसरून मी आज मैदानावर उतरले होते. शांतचित्ताने चेंडूवर लक्ष पेंद्रित करून मी लढले. मी एक एक गुणासाठी संघर्ष केला. चुरशीच्या लढतीत विजय मिळविण्यात यशस्वी ठरल्याने साहजिकच आनंद झाला.’
n भाविनाबेन पटेल




























































