युवासेनेचे (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या असून त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरुपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

विस्तारक – प्रियंका जोशी (बुलढाणा व अकोला जिल्हा), गीता कदम (परभणी व नांदेड जिल्हा), गीता झगडे (अमरावती व यवतमाळ जिल्हा), दीक्षा संखे – कारकर (पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा), सहसचिव – शामला यवल, शमिका राणे. मुंबई समन्वयक – ललिता मुरकुटे, नमिता नाईक, प्रांजल महाडेश्वर, शायनाज शेख, श्रद्धा घाग, प्रिया सूर्यवंशी, शीतल जाधव, चैताली गावडे, तेजस्विनी सूर्यवंशी. जिल्हा युवती अधिकारी – अॅड. भक्ती दांडेकर (वसई व नालासोपारा विधानसभा), निधी बांदिवडेकर  (बोईसर व विक्रमगड विधानसभा), अॅड. तेजश्री जाधव (लातूर जिल्हा), पियुशिखा मोरे (अमरावती जिल्हा).`