
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आहेत, असे सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले. पूजेसाठी 50 व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. त्यांनी पूजेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना होणाऱ्या बाप्पाची मूर्ती चार फुटांपर्यंत, तर घरगुती बाप्पाची मूर्ती दोन फुटांची असावी. गणेशाच्या पूजेसाठी 20 व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. अनावश्यक खर्च टाळून मंडळांनी कोरोनाविषयक जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.























































