
कोंढव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिग अँड मॅनेंजमेंट (एनआयबीएम) संस्थेच्या आवारातील चंदनाचे झाड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयबीएम संस्थेतील सुरक्षारक्षक प्रमोद कटके यांनी त क्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेचा परिसर मोठा असून संस्थेच्या आवारातील वसाहतीजवळ नाला आहे. नाल्याशेजारी असलेले चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत.



























































