
उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील संगीपूर गावात भारतीय जनता पक्षाचे खासदार संगमलाल गुप्ता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी पळवून नेत जबर मारहाण केली. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर खासदारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.भाजप खासदारांच्या गाडीचीही तोडपह्ड यावेळी करण्यात आली. खासदार गुप्ता प्रतापगडच्या सांगीपूरमध्ये एका आरोग्य शिबिरात सहभागी होण्यासाठी गेले असता ही घटना घडली. कार्यक्रमादरम्यानच भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला.
उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील संगीपूर गावात भारतीय जनता पक्षाचे खासदार संगमलाल गुप्ता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी पळवून नेत जबर मारहाण केली.#SangamLalGupta #BJP #Congress pic.twitter.com/XxJTeAhGRX
— Saamana (@SaamanaOnline) September 26, 2021
सांगीपूर गावात आयोजित गरीब कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप खासदारांसह काँग्रेस नेते आणि माजी खासदार प्रमोद तिवारी हेही उपस्थित होते. भाजप खासदार संगमलाल गुप्ता कार्यक्रमस्थळी पोहचताच काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांत एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी झाली. उभय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खासदार गुप्ता आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पळवून नेत जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी दिले आहेत.
मारहाण झालेल्या भाजप खासदार गुप्ता यांची प्रतिक्रिया#SangamLalGupta #Congress #bjp pic.twitter.com/jnCVuJqS4A
— Saamana (@SaamanaOnline) September 26, 2021

























































