पुण्यात पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशी बनावटीचे बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला वारजे पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून पिस्तुल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. शुभम शंकर काची (वय २४, रा. रामनगर, वारजे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

काची वारजे भागातील रामनगर परिसरात सराईत थांबला होता. तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकातील अण्णा काटकर आणि विजय भुरूक यांना मिळाली. त्यांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, मनोज बागल, गोविंद फड, अमोल राऊत, रमेश चव्हाण, अजय कामठे यांनी केली.