मार्चनंतर राज्यात प्रथमच दोन हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला असला तरी आज कोरोनाची अतिशय दिलासादायक आकडेवारी आली आहे. राज्यात मार्चनंतर प्रथमच दिवसभरात दोन हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा संसर्ग उतरणीला लागलेला आहे; पण तरीही सणासुदीच्या काळात तिसऱया लाटेचा धोका कायम असल्याचा इशारा दिला आहे.

राज्यात दिवसभरात 1 हजार 736 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97. 34 टक्क्यांवर आला आहे, तर मृत्यूचा दर 2. 12 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 4 हजार 320 रुग्ण  कोरोनावर मात करून घरी परतले.