
औराद शहाजानी येथील छत्रपती शिवाजी चौकात गुरुवारी संध्याकाळी 4.45 वाजता लातूर-जहिराबाद महामार्गावर लहान मुलगा रस्त्याच्या पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना अचानक शिवाजी चौकात ट्रक आल्याने त्या ट्रकखाली चिरडून एका 6 वर्षांच्या माणीक बबलु अंतरेड्डी या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
लातूर-जहिराबाद महामार्गावर औराद येथे या मार्गाला फुटपाथ नसल्यामुळे येथील हाथगाडे व प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर थांबत असल्याने येथून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. येथील मुख्य रस्त्यावर वाहतुकिस अडथळे होत आहेत. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे.
लातूर-जहिराबाद महामार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी सध्याकाळी 4.45 वाजता माणीक बबलु अंतरेड्डी नावाचा बालक त्याच्या आईसोबत रस्ता ओलांडून घराकडे जात होता. त्यावेळी अचानक ट्रक आल्याने लहान मुलगा घाबरुन हात सोडून पळथ जाताना ट्रकखाली सापडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. संभाव्य अपघात टाळण्यासाठी या मार्गावर फुटपाथ करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.




























































