
”ठिक आहे, चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पवारसाहेबांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी जास्त न बोलता वरील दोन वाक्यात बोलून चंद्रकांत पाटील यांचा सूचक समाचार घेतला.






























































