
लातूरमध्ये महावितरणच्या कर्मचार्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
महावितरणच्या शिरुर ताजबंद उपविभागातील हंडरगुळी येथे टेक्निशियन म्हणून कार्यरत असणार्या रहिम पापामियाँ शेख याने तक्रारदार यांना विद्युत मीटरसाठी केलेल्या ऑनलाईन अर्जाच्या अनुषंगाने कनेक्शन देण्यासाठी सर्व कागदपत्रे नव्हते. त्यामुळे कुठलीही त्रुटी न काढता मदत करून कनेक्शन देण्यासाठी 2500 रुपयांची लाच मागितली. तेव्हा लाचेची रक्कम स्वतः स्विकारताच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात रहिम पापामियाँ शेख अडकला. वाढवणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



























































