
अभिनेत्री स्वरा भास्करवर पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली आहे. एका व्हायरल व्हिडीओवर तिने केलेल्या विधानामुळे तिच्यावर ही टीका होत आहे.
स्वराने एक व्हिडीओ तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ गुरुग्राम इथला आहे. येथील सेक्टर 12 ए मध्ये एका सार्वजनिक ठिकाणी मुसलमान धर्मीय नमाज पढताना दिसत आहेत. तेथे काही हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. त्यामुळे तिथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वरानेही तिच्या ट्विटर हँडलवर शेअर केला. त्यावर तिने हिंदू असल्याची लाज वाटते, अशी कॅप्शनही दिली आहे. त्यावरून तिच्यावर टीकेची जबरदस्त झोड उठली आहे.
या ट्विटरचे पैसे मिळाले का इथपासून ते हिंदू धर्म सोडत का नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.
As a Hindu I’m ashamed! https://t.co/26OfIqTeHO
— Swara Bhasker (@ReallySwara) October 22, 2021



























































