मराठी थरारपट ‘बळी’ ओटीटीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी थरारपट ‘बळी’ 9 डिसेंबर रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये स्वप्नील जोशी,  पूजा सावंत व समर्थ जाधव यांच्या भूमिका आहेत.

 ‘बळी’ या चित्रपटात विधुर, मध्यमवर्गीय पिता असलेला  श्रीकांतच्या म्हणजे स्वप्नील जोशी याचा जीवनप्रवास दाखवला आहे. त्याचा सात वर्षांचा मुलगा मंदार चक्कर येऊन पडतो. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात येते. तिथून श्रीकांतच्या जीवनाला कलाटणी मिळते. मंदार एका रहस्यमय परिचारिकेसोबत बोलायला सुरुवात करतो.  ती परिचारिका हॉस्पिटलच्या पडक्या भागामध्ये राहत असल्याचा दावा मंदार करतो. ‘बळी’ चे दिग्दर्शन विशाल फ्युरिया यांनी केले आहे. लपाछपीच्या यशानंतर विशाल फ्युरिया यांचा हा दुसरा थरारपट आहे. विशाल फ्युरिया म्हणाले,  हॉरर या शैलीने माझे लक्ष वेधून घेतले आहे आणि या शैलीमध्ये काहीतरी नवीन घेऊन येण्याचा माझा प्रयत्न आहे, असे फ्युरिया यांनी सांगितले.