
वंदे भारतम्-नृत्य उत्सव स्पर्धेची निवड प्रक्रिया विभागीय स्तरावर पुढील टप्प्यात पोहोचली आहे. विभागीय स्तरावर 9 ते 12 डिसेंबर या कालावधीत चार वेगवेगळ्या शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. स्वातंत्र्य उत्सवाचा अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सांस्कृतिक मंत्रालयाने ‘वंदे भारतम्-नृत्य उत्सव’ ही अखिल भारतीय नृत्य स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश देशभरातील उत्कृष्ट नृत्य प्रतिभांची निवड करणे आणि त्यांना प्रजासत्ताक दिन परेड 2022 मध्ये सादरीकरण करण्याची संधी प्रदान करणे हा आहे. 10 डिसेंबरला मुंबई, 11 डिसेंबरला बंगळुरू आणि 12 डिसेंबरला नवी दिल्लीत होणार आहे. विभागीय स्पर्धेतील विजेत्यांची 13 डिसेंबर रोजी घोषणा केली जाईल. आतापर्यंत 205 संघांमधील 2507 सदस्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे, तर सर्वाधिक निवडलेले 480 नर्तक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सादरीकरण करतील.























































