
आपल्या अभिनयाच्या 30 वर्षांच्या करिअरमध्ये सचिन खेडेकर यांनी अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. पण ते सोनीलिव्हवरील आगामी काल्पनिक सिरीज ’दि व्हिसलब्लोअर’सह ओटीटी क्षेत्रामध्ये धुमाकूळ निर्माण करण्यास सज्ज आहेत. ही सीरिज गुणवंत विद्यार्थ्यांना कशाप्रकारे डावलले जाते आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या ऐवजी अपात्र विद्यार्थ्यांना कशाप्रकारे संधी दिली जाते हे दर्शवते. सचिन खेडेकर यांनी या सिरीजमध्ये प्रामाणिक व्यक्ती डॉ. अश्विन भदोरियाची भूमिका साकारली आहे. अश्विन वैद्यकीय कॉलेजचे प्रमुख आहेत. त्यांचा मुलगा एका वादामध्ये अडकतो आणि त्यांचे जीवन उद्ध्वस्त होऊन जाते. ओटीटी पदार्पणाबाबत खेडेकर म्हणाले, ’’ डिजीटल पदार्पणासाठी ’दि व्हिसलब्लोअर’ सारखे दुसरे उत्तम कथानक असू शकत नाही. ही अत्यंत रोमांचक सिरीज आहे आणि मला खात्री आहे की, प्रेक्षक या सिरीजमध्ये गुंतून जातील.’’ या सीरिजमध्ये सचिन खेडेकर यांच्यासह रित्विक भौमिक, रवी किशन, सोनाली कुलकर्णी, अंकिता शर्मा, आशिष वर्मा, रिद्धी खाकर, जाकिर हुसैन मुख्य भूमिकेत आहेत



























































