त्रिंबक ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था निवडणूक- शिवसेना पुरस्कृत शिवशक्ती सहकारी पॅनल विजयी; भाजपचा दारुण पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

त्रिंबक ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर शिवसेना पुरस्कृत शिवशक्ती सहकारी पॅनलने भाजप पुरस्कृत सिद्धीविनायक सहकार पॅनलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता स्थापन केली. भाजप पुरस्कृत पॅनलला एकाही जागी विजय मिळवता आला नाही. येथील सर्वच्या सर्व 13 ही जागांवर शिवसेनेच्या पॅनलने विजय मिळविला.

मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य अशोक बागवे यांच्या त्रिंबक गावात भाजपला जोरदार धक्का बसला. स्थानिक शिवसेना नेते समीर हडकर यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या निवडणुकीत शिवशक्ती सहकारी पॅनलने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. या निवडणूकीत आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रघुनाथ घाडी, विभाग प्रमुख समीर लब्दे, संतोष तेली, श्रीकांत बागवे, संतोष गोरवले, एकनाथ चिंचवलकर, राजू हिर्लेकर, बाळू बाणे, अशोक वाळवे, अनिल गांवकर, शंकर गांवकर यांच्या सहकार्याने भाजप पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडवण्यात आल्याचे समीर हडकर यांनी सांगितले.

हा विजय शिवसेनेवरील विश्वासाचा : हरी खोबरेकर
सोसायटी निवडणुकीतील हा विजय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा आहे. सभासद, मतदार व जनतेच्या विश्वासाचा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.