‘जवाहर नवोदय’च्या 19 विद्यार्थ्यांची कोरोनावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 91 कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थ्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांपैकी 15जण पारनेर ग्रामीण रुग्णालयात, तर इतर चारजण टाकळी ढोकेश्वर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.

कोरोनावर मात केलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे. पारनेर ग्रामीण रुग्णालयातून विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आमदार नीलेश लंके उपस्थित होते. यावेळी आमदार लंके यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके व गुलाबपुष्पांची भेट दिली. दरम्यान, वसतिगृहात विलगीकरणात असलेल्या सुमारे 350 विद्यार्थ्यांना विलगीकरण कालावधी संपल्यामुळे मंगळवारी घरी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, महसूल प्रशासनाकडून तशा सूचना आलेल्या नसल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.