सांगलीत कृष्णा नदीपात्रात दुर्मिळ पाणमांजराचा वावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृष्णा नदीवरील कसबे-डिग्रज बंधारा व अंकलखोप परिसरात दुर्मिळ पाणमांजराचा वावर असल्याचे आढळून आले आहे. मगरीच्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या इक्बाल पठाण व ढवळे या वनमजूरांना हे पाणमांजर आढळले.

पठाण यांना एक मुंगूस असल्याचे वाटले. त्यांनी मोबाईलवर फोटो काढून ते मानद वन्यजीव संरक्षकांना पाठविले. तेव्हा ते पाणमांजर असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून हा प्राणी नदीकाठावर वावरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शनिवारी अंकलखोप येथे हाळ भागात डॉ. अनिरुद्ध पाटील आणि भिलवडीमध्ये सुजित चोपडे यांनी पाणमांजराला कॅमेराबद्ध केले. भरपूर पाणी आणि लपण्याजोगी जागा असल्याने पाणमांजर कृष्णाकाठी फिरत असावे, असे मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील यांनी सांगितले.