जोकोविचवरील ऑस्ट्रेलियन प्रवेशबंदीचे शुक्लकाष्ठ संपणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील अग्रमानांकित टेनिसपटू नोव्हाक जोकोविचची रविवारी ऑस्ट्रेलियातून घरवापसी झाली. त्यामुळे त्याला सोमवारपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला मुकावे लागलेच, शिवाय त्याच्यावर ऑस्ट्रेलियन व्हिसा नियमानुसार तीन वर्षांच्या प्रवेशबंदीचेही संकट आहे. मात्र ही बंदी हटवण्याचे संकेत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्काॅट मॉरिसन यांनी दिले आहेत. त्यामुळे जोकोला काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोरोना लसीकरणाविना ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याची सरकारची पृती केंद्रीय न्यायालयाने रविवारी वैध ठरवली. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया सोडावे लागले. परकीय नागरिक कायद्यांनुसार त्याला पुढील तीन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळू शकत नाही; परंतु बंदी घालण्यात आलेल्या व्यक्तीने मांडलेली बाजू पटल्यास परकीय नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांना ही बंदी हटवण्याचा अधिकार आहे.