दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा लेखी स्वरूपात म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होतील. सध्या तरी परीक्षेत कोणताही बदल केलेला नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी परीक्षांचा अभ्यास आणि त्याची तयारी करावी असे आवाहनही त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना केले. राज्यातील काही विद्यार्थी आणि पालक संघटनांकडून दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी केली जात आहे. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात कमी होत आहे त्यातच शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांचेही लसीकरण होत आहे. शाळादेखील पुन्हा सुरू करण्याचे नियोजन असल्याने दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होतील, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.