रॉक गार्डन पर्यटकांसाठी पुन्हा खुले; मालवण पालिका प्रशासनाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जानेवारी महिन्यात राज्य शासनाने अनेक निर्बंध लागू केले होते. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी उद्यानेही बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत झाल्याने काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

उद्याने खुली करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 22 दिवस बंद असलेले मालवणचे रॉक गार्डन मंगळवारपासून राज्य शासनाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मालवण पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी मंगळवारी दिली. पर्यटकांसाठी रॉक गार्डन पुन्हा एकदा खुले झाले आहे. त्यामुळे आता पर्यटकांना रॉक गार्डनला भेट देता येणार आहे.