
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना शुक्रवारी सूर्यकिरणांनी महाभिषेक केला. सकाळी सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश… असा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करीत हा महाभिषेक केला.
































































