
आपल्या सर्वांसाठी ‘झोप’ अत्यंत महत्त्वाची आहे. उत्तम आरोग्यासाठी समतोल आणि पौष्टिक आहाराइतकंच झोपेलासुद्धा महत्त्व आहे. कारण जेव्हा झोप अपुरी होते तेव्हा त्याचे परिणाम वाईट व्यक्तीच्या आरोग्यावरही होतात. हल्ली ताणतणाव, व्यस्त जीवनशैली यामुळे निद्रानाशाच्या समस्येचा सामना करणारे अनेक लोक आहेत. ज्यांना तासनतास शांत झोप लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. रात्रभर शांत झोप न लागल्याने सकाळी उत्साही वाटत नाही. दिवसभर आळस जाणवतो. असे जर तुमच्या बाबतीत होत असेल तर काहीही काळजी करू नका, कारण ‘या’ सोप्या ट्रिकचा वापर करून तुम्हाला काही सेकंदातच शांत झोप लागू शकते. जाणून घेऊया या तंत्राबद्दल-
रात्रीच्या वेळी शांतता असूनही झोप लागत नाही, याचे कारण जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. काही वेळा झोप न लागण्यामागे लोकांच्या वाईट सवयी हे कारणही असू शकते, तर काही जण अनेक वेळा लवकर झोपण्याचा बहाणा करतात, पण तासनतास फोनमध्ये बघत राहतात. झोपताना इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरणे हे निद्रानाशाचे मुख्य कारण आहे. झोप न येण्याच्या समस्येमुळे अनेक जण औषधांचाही आधार घेतात, मात्र ‘ब्रीदिंग टेक्निक’ चा अवलंब करून कोणत्याही औषधाशिवाय तुम्हाला शांत झोप लागू शकते. झोप न लागण्याच्या समस्येने त्रस्त असेल्यांना तसेच जे मध्यरात्रीच अर्धवट झोपेतून जागे होतात, अशांना या झोपेच्या सोप्या तंत्राची नक्कीच मदत होईल.
शांत झोपेचे ‘ब्रिदिंग टेक्नीक’
4-7-8 या तंत्राचा वापर करून शांत झोप लागल्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने श्वास घेण्याचे तंत्र वापरण्यासाठी आधी 4 सेकंद श्वास घ्या आणि 7 सेकंद श्वास रोखून ठेवा त्यानंतर 8व्या सेकंदाला श्वास सोडा. या तंत्रामुळे मन शांत राहाते, तणाव कमी होतो, स्नायूचे दुखणे कमी होऊन वेदना कमी होतात. श्वसनक्रियेचे हे टेक्निक वापरून तुम्हाला 60 सेकंदात शांत झोप लागू शकते. 4-7-8 श्वासोच्छवासाच्या तंत्राने निद्रानाशाची समस्या दूर होऊ शकते शिवाय अति राग, मायग्रेन, ताणतणाव आणि एंग्जायटी यासारख्या समस्यादेखील नियंत्रणात राहतात. झोपेच्या या तंत्राचा वापर किमान 6 आठवडे केल्यास शांत आणि गाढ झोप लागायला मदत होते शिवाय ह्रदयविकार असलेल्या रुग्णांसाठी हे श्वासाचे तंत्र अत्यंत फायदेशीर आहे.




























































