उडत्या हेलिकॉप्टरला लटकून वर्कआऊट; करामती माणूस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी वर्कआऊट बरेच लोक करतात, पण  हेलिकॉप्टरला लटकून वर्कआऊट करताना कुणाला बघितलंय का? तेही उडत्या हेलिकॉप्टरमध्ये! अशीच एक करामत केलेय, आर्मेनियामध्ये राहणाऱ्या रोमन सहराद्यानने. त्याने चक्क एका मिनिटात उडत्या हेलिकॉप्टरला लटकून 23 पुलअप केले. यानंतर त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रोमन सहराद्यानचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये रोमन हेलिकॉप्टरची लँडिंग साईड पकडून लटकताना दिसत आहे. यानंतर हेलिकॉप्टर टेक ऑफ होतो आणि रोमन हवेत लटकतो. यानंतर तो हवेत उडणाऱ्या हेलिकॉप्टरला लटकून तो अतिशय कुशलतेने पुलअप करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. रोमनने मागील वर्षी 2 ऑक्टोबरला आर्मेनियाच्या येरेवनमध्ये हा विक्रम केला.