
रिअॅलिटी शोमधून पुढे आलेले सेलिब्रिटी कपल वरुण व दिव्या अगरवाल यांचे ब्रेकअप झाले आहे. दिव्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने हे नाते तोडल्याचे सांगितले आहे.
‘जीवन एक सर्कस आहे. आपल्याला कायम सर्वांना खूश ठेवावे लागते. मात्र या सर्व गोष्टीत आपण स्वत:साठी जगणं विसरतो. मी कुठल्याही गोष्टीसाठी कुणाला जबाबदार धरत नाही. पण हे माझ्यासोबत घडतंय. मी आता स्वत:साठी जगायचं ठरवलं आहे. स्वत:साठी जगण्यात काही चुकीचं नाही. मी इथे जाहीर करू इच्छिते की आता मला माझ्याआधारावर जगायचं आहे. मी आता माझा वेळ माझ्यावर खर्ची करणार. जर मला एखाद्या नात्यातून बाहेर पडायचं आहे तर तो पूर्णपणे माझा निर्णय असेल. मी वरुणसोबत जो वेळ घालवला तो खूप सुंदर होता. तो चांगला व्यक्ती आहे. त्यामुळे लोकांनी माझ्या निर्णयाचा सन्मान ठेवावा’, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
दिव्याचे वरुणच्या आधी प्रियांक शर्मासोबत अफेयर होते. प्रियांक व ती स्प्लिट्सविलामध्ये एकत्र होते व शो संपल्यानंतरही त्यांचे अफेयर होते. मात्र जेव्हा प्रियांक बिग बॉसमध्ये गेला तिथे त्याचे बेनाफ्शासोबत सूत जुळले. त्या गोष्टीचा दिव्याला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर दिव्या वरूणला डेट करू लागली. दिव्याने बिग ब़ॉस ओटीटीचे पहिले सिझन जिंकले आहे.
























































