
टॅलेंट प्रिंटने महिला अभियंता कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. संपूर्ण तंत्रज्ञान स्पेक्ट्रमवर केंद्रित उपक्रमांद्वारे महिलांना गुंतवून ठेवण्याच्या, सक्षम करण्याच्या या कार्यक्रमाला गुगलचे पाठबळ मिळाले आहे. विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील उद्योजक आणि महत्त्वाकांक्षी महिला विद्यार्थ्यांना उच्च-वाढीच्या तंत्रज्ञान करीअरसाठी तयार करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सॉफ्टवेअर अभियंता बनण्यासाठी प्रथम वर्षातील 250 महिला विद्यार्थिनींचा शोध घेऊन त्यांना तयार करणे हे यावर्षी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. गुगलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिव वेंकटरामन म्हणाले, आधीच्या महिला गटाने मिळवलेल्या यशामुळे या कार्यक्रमाचा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहन मिळालेले आहे. अर्ज कसा करायचा याच्या माहितीसाठी अर्जदार https://we.talentsprint.com या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

























































