कृत्रिम खाद्यरंग लावून चहा पावडरची पॅकिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृत्रिम खाद्यरंग लावून चहा पावडरची पॅकिंग सुरू असलेल्या कागल तालुक्यातील लिंगनूर येथील चहाच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाकडून धाड टाकळ्यात आली. या कारवाईत 26 हजार 800 रुपयांचा माल जप्त करण्यात आला

बसवण टी सेंटरचे मालक बसवराज महादेव सदलगे हे चहा पावडरला कृत्रिम खाद्यरंग लावून पॅकिंग करीत होते. चहा तयार करताना चहाला गडद रंग येण्यासाठी व चहाचा खप वाढावा यासाठी कृत्रिम खाद्यरंग हा चहाला लावला जात असल्याचे आढळले. रंग लावलेली 25 हजार 80 रुपये किमतीची 100 किलो चहा पावडर व 1 हजार 800 रुपये किमतीचे 4.5 किलो कृत्रिम खाद्यरंग जप्त करण्यात आला. हे टी सेंटर विनापरवाना सुरू असल्याचे आढळल्याने व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती सहायक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिली.