एमपीएससी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना पंधरवडय़ात नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2019 मध्ये घेतलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक- टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना पंधरा दिवसांमध्ये नियुक्ती देण्यात येईल अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी पदभरती विहित वेळेत करण्यासंदर्भात विधानसभा सदस्य विनय कोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री भरणे यांनी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती दिली. कर सहाय्यकांच्या पदांवर 126 आणि लिपिक टंकलेखकाच्या पदांवर 179 उमेदवारांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे 33 दुय्यम निरीक्षकांपैकी 17 जणांना नेमणूक आदेश देण्यात आले आहेत असे भरणे यांनी सांगितले. या चर्चेत चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, नाना पटोले, योगेश सागर यांनी भाग घेतला.