पाकिस्तान हादरले; निमलष्करी दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानात एकीकडे सत्तासंघर्ष पेटला असताना निमलष्करी दलाच्या तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याने देश हादरून गेला आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टँक जिह्यात निमलष्करी दलाच्या तळावर बुधवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानच्या सुरक्षा दलांतील सहा सैनिकांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले आहेत. तसेच तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याचेही वृत्त आहे. आत्मघाती हल्लेखोराने लष्करी छावणीत घुसून हा हल्ला केला.  तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला.