इनडोअर क्रिकेट विश्वचषकासाठी निवड चाचणी रविवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) 8 ते 15 ऑक्टोबर 2022 या कालावधीत इनडोअर क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाऊंडेशनने (IISF) हिंदुस्थानी संघाची बांधणी करण्यासाठी राष्ट्रीय निवड स्पर्धा मे अखेरीस बंगळुरू येथे आयोजित केली आहे. यासाठी महाइनडोअर क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्रात मैदानी निवड चाचणी घेण्याचे जाहीर केले आहे. सदर निवड चाचणी 24 एप्रिल रोजी पुरुष-महिला (खुला गट) व 21 वर्षांखालील (16 ऑक्टोबर 2000 नंतर जन्मलेले) मुला-मुलींसाठी आयोजित केली जाणार असून या निवड चाचणीमधून महाराष्ट्राचा प्राथमिक संघ निवडला जाणार आहे.

ही निवड चाचणी अर्बन स्पोर्ट्स सेंटर, (अँटानिया डिसिल्व्हा टेक्निकल हाय.), स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे आयोजित केली आहे. या निवड चाचणीसाठी केंद्रावर सकाळी 7.30 वा. महिला व 21 वर्षांखालील मुली यांच्यासाठी नोंदणी सुरू होणार आहे तर दुपारी 3.30 वा. पुरुष व 21 वर्षांखालील मुलांची नोंदणी केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी बाळ तोरसकर (महासचिव) यांच्याशी 9869135083 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन असोसिएशनतर्फे केले आहे.